मोदी सरकार 'या' राज्यांमध्ये 7 मेगा टेक्सटाईल प्लांट उभारणार

20 लाख लोकांना मिळणार रोजगार

मेक इन इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने देशात सात मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याची योजना जाहीर केली आहे.

पी एम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड अपेरल (PM MITRA) योजनेंतर्गत घोषित करण्यात आले.

हे सात प्लांट तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये उभारले जातील.

पीएम मोदींनी स्पष्ट केले होते की “पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील, करोडोची गुंतवणूक होईल आणि लाखो नोकऱ्या निर्माण होतील.

हे 'मेक इन इंडिया' आणि 'मेक फॉर द वर्ल्ड'चे उत्तम उदाहरण असेल.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, सरकारने सुमारे 20 लाख नोकऱ्या निर्माण करण्याच्या उद्दिष्टासह जवळपास ₹70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे.

देशात वस्त्रोद्योग असंघटित झाला आहे.या वाढलेल्या अपव्यय आणि लॉजिस्टिक खर्चामुळे देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम झाला आहे.