जगातील ७५% वाघ भारतात, पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

‘प्रोजेक्ट टायगर’चे यश केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी अभिमानाची बाब आहे.

'प्रोजेक्ट टायगर''च्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ उद्‍घाटनात, पंतप्रधानांनी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ देखील लॉन्च केले.

जे वाघ आणि सिंहांसह जगातील सात मोठ्या मार्जार कुळातील प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करेल.

या अलायन्सचा प्रारंभ करताना, मोदी म्हणाले की, ‘व्याघ्र योजनेला ५० वर्षे पूर्ण होणे हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.

केवळ भारतात वाघांचे संरक्षण नाही, तर त्यांची भरभराट करण्यासाठी सर्वोत्तम परिसंस्था प्रदान केली गेली आहे.

१९७३ मध्ये ९ व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेली व्याघ्र संवर्धन योजना ५३ राखीव क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे.

२३ व्याघ्र संरक्षित क्षेत्रांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.