हाडांच्या मजबुतीपासून ते निरोगी हृदयासाठी सोया मिल्कचे फायदे

अनेक विटामिन्स, खनिजं, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेलं सोया मिल्क हे एक शुद्ध शाकाहारी दूध मानलं जातं.

यात Vitamin B12, Protein, Sodium, Fiber, Potassium, Fatty Acids, Phosphorus, Iron आणि Minerals उपलब्ध असतात. 

सोया मिल्कचे फायदे:

हाडं मजबूत करण्यासाठी- सोया दूधात तुम्ही मध मिसळून त्याचं नियमित सेवन केल्यास हाडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हृदयासाठी- सोया दूधामुळे हृदयाचं कार्य योग्य प्रकारे चालतं आणि आजारांचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी- सोया मिल्कमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी तर फायबर भरपूर असतं यामुळे भुकेवर नियंत्रण ठेवण्यास आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते- सोया मिल्कमध्ये जास्ती प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडंट इम्यूनिट बूस्ट करतात. तसचं विटामिनब बी १२ मुळे शरीरातील थकवा दूर होते.

नाश्तावेळी सोया मिल्कचं सेवन केल्यास दिवसभर शरीरामध्ये उर्जा राहते. 

केसांसाठी- सोया मिल्कमुळे केसांना आवश्यक प्रोटीन मिळत असल्याने केस मुळापासून मजबूत होतात आणि केसांची जलद वाढ होते.

त्वचेसाठी- तसचं या दूधातील काही तत्व हे अँटी - एजिंगचं काम करतात. त्यामुळे त्वचा तरुण दिसते आणि हायपरपिग्मेंटेशनही कमी होते. 

कॅन्सरचा धोका कमी- सोया मिल्कमध्ये सोया प्रोटीन आणि आयसोफ्लेवोंस हे अँटी- एस्ट्रोजेनिक गुणांनी समृद्ध असतं. या मुळे कॅन्सरच्या कोशिका वाढत नाहीत. 

सोया मिल्क तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी घेऊ शकता. 

Click Here