कोकणच्या हापूस राजाची आवक झाली कमी; कर्नाटकचा आंबा खातोय भाव

वादळी वारे, गारपीट अन् ढगाळ वातावरणामुळे रायवळ आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. 

कैरीचे उत्पादन आधीच कमी असून, जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झाडावरील कच्चे आंबे झडले गेले आहे.

रायवळ आंब्यांच्या झाडांना या वर्षी आधीच उशिरा मोहर आला अन् नंतर वारंवार आलेल्या ढगाळ वातावरणाने बराचसा मोहर गळून गेला. 

यावर्षी कोकणातही हापूसच उत्पादन कमी झाले. त्यामुळे हापूसचे दर सामान्यांच्या आवाक्‍यात राहिले नाहीत. उपलब्ध आंबे प्रतीनुसार ६०० ते ८०० रुपये डझनाने विक्री होत आहेत.

आता बाजारपेठेत मद्रास, कर्नाटकातील आंबा येऊ लागला आहे. मद्रास हापूसचा दर सध्या ५०० ते ६०० रुपये डझन आहे. कर्नाटकातील आंब्यांचा दर ४०० ते ५५० रुपये डझन आहे. 

त्यापूर्वीच कलमी आंबे बाजारात दाखल होत आहेत. देशी हापूस, रत्ना, केशर जातीचा आंबा बाजारपेठेत विक्रीस येत आहे. 

मद्रास, कर्नाटकातील आंब्यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही. तेथेही उत्पादनात विविध कारणांनी घट झाली आहे. पंधरा- वीस वर्षांत अशी परिस्थिती प्रथमच पाहात आहे.