डोकेदुखीवर Instant Relief हवाय ?

डोकेदुखी हा असा आजार आहे जो तुम्हाला कधीही कुठेही आमंत्रण न देता भेटायला येऊ शकतो. 

या आजाराची अनेक कारणं आहेत. सतत मोबाईल घेऊन बसलात तरी, काहीवेळा शिळ अन्न खाऊनही, तर याची गंभीर कारण- सतत घेतलेला ताण तणाव आणि मानसिक आजार. 

डोकेदुखीवर सतत गोळ्या,औषधे घेणं हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही या काही घरगुती उपायांनी आराम मिळवू शकता. 

पाणी

उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेड होऊ शकतं. शरीराला पुरेसं पाणी दिवसभरात प्यायलं पाहिजे. त्यामुळे डोकेदुखी थांबू शकते.

लवंग

तव्यावर काही लवंगा शेकून घ्या, गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

आलेयुक्त चहा

आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते.

कलिंगड खा

कलिंगडात नैसर्गिकरित्या पाण्याचा प्रमाण जास्ती असतं. त्यामुळे जर शरीर डिहायड्रेड झालं असेल तर कलिंगडामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची पातळी स्थिर होण्यास मदत मिळते.

स्ट्रेच करून पहा

काही वेळा पाठीचा वरचा भाग, मान, खांदे यांच्यावर ताण पडल्याने डोकं दुखतं. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात.

बर्फाचा शेक

अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळे डोकेदुखी होते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते.

Click Here