उन्हाळ्यात Diabetes वाढण्याचा धोका अधिक? 

आता उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांचे शरीर डिहायड्रेड होऊ शकते.

उन्हाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. 

जेवण झाल्यावर तीन तासानंतर अर्ध्या तास चालले पाहिजे. रात्रीच्या जेवणानंतरही शतपावली केली पाहिजे.

फायबरचे पदार्थ खा - फायबरयुक्त पदार्थांमध्ये संपूर्ण धान्य जसे की ओट्स, ब्राऊन राइस, संपूर्ण धान्य ब्रेड आणि तृणधान्ये, फळे, बिया, नट, भाज्या जसे की झुकिनी, गाजर, टोमॅटो इ.

पाण्याचे सेवन - दिवसाला तीन लिटर पाणी आपल्या शरीराला हवं असतं. 

शुगर तपासणे - लोकांनी शुगर सतत तपासली पाहिजे, त्यामुळे किती साखरेची गरज आहे, हे लक्षात येते. त्या प्रमाणावरून काय खावे, काय नाही हे ठरवणे सोपे जाते.

तुम्हाला इन्सुलिनचे सेवन बदलण्याची आवश्यकता असू शकते म्हणून उन्हाळ्याच्त तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उन्हात फिरू नका - सनबर्नमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. म्हणून सनस्क्रीनचा वापर करा तसेच बाहेर जाताना टोपी, सनग्लासेस आणि छत्री वापरा.

कॅफिन सेवन कमी करा - उन्हाळ्यात कॉफी सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते व शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. 

आंब्यासारख्या रसदार फळांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. या दिवसांत आंब्यामुळे मधुमेह वाढण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये जास्त दिसून येते.

मधुमेही रुग्णांना उन्हाळ्यात एखादी जखम झाली आणि ती लवकर भरून निघत नसेल तर अशा व्यक्तींना गॅंगरिनचा धोका असतो. 

या दिवसांत घामामुळे त्वचा कायम ओलसर राहते. त्यामुळे ‘फंगल इन्फेक्‍शन’चा धोका वाढतो.